नांदेड दि.-18 नांदेडच्या स्व.मीनाताई ठाकरे स्मृति प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा, अतिशय सन्मानाचा ‘नांदेड भूषण’ हा पुरस्कार, येथील प्रसिध्द व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र विश्वनाथ अप्पा हुरणे यांना जाहीर झाला आहे. रोख रूपये 11 हजार, स्मृतिचिन्ह व महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप आहेे.
आज एका भरगच्च पत्रकार परिषदेत या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व माजी शिवसेना आमदार अनसूया खेडकर 2011 सालासाठी देण्यात येणार्या या पुरस्काराची घोषणा केली. त्यावेळी स्व.मीनाताई ठाकरे स्मृति प्रतिष्ठानचे सचिव व शिवसेना उपजिल्हाप्रमुख ऍड.दिलीप ठाकूर, सहसचिव महेश खेडकर उपाध्यक्ष धोंडू पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यापूर्वी ज्येष्ठ पत्रकार सुधाकरराव डोईफोडे, प.पू.जगदीश महाराज, कामगार नेते ऍड.अनंत नागपूरकर, कीर्तनकार डॉ. बाळासाहेब साजणे, शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य गो.रा.म्हैसकर, साहित्यिक विचारवंत शेषराव मोरे, नाटककार प्राचार्य दत्ता भगत, संत बाबा बलविंदरसिंघ, कृषितज्ज्ञ डॉ.शिवाजी शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सविता भालेराव, विधिज्ञ आर.एन.खंाडिल, नांदेडचे पर्यावरणसंरक्षक संत बाबा नरेंद्रसिंघ यांना ‘नांदेड भूषण’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले आहे.
रविवार दि. 26 फेब्रुवारी 2012 रोजी प्रकाशखेडकर स्मृती अ.भा. बहुभाषिक कवि संमेलनात मान्यवरांच्या हस्ते ‘व्यापारी क्षेत्रासाठी दिला जाणारा हा पुरस्कार सर्व प्रथम मला मिळतोय याचे मला समाधान आहे माझ्या समाजकार्याची नोंद घेऊन त्याची पावतीच जणू या पुरस्काराच्या रुपाने मिळाली आहे. माझे आईवडिल, शिक्षक यांनी माझ्यावर केलेल्या संस्काराचेच हे फळ आहे असे मी समजतो’ या शब्दात राजेंद्र हुरणे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आज दिवसभर राजेंद्र हुरणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9422171210 हा आहे.